STORYMIRROR

VINAYAK PATIL

Comedy Others

3  

VINAYAK PATIL

Comedy Others

गद्दे पासष्टी

गद्दे पासष्टी

1 min
212

दिस सरले वयाचे 

पूर्ण झाली माझी षष्टी 

आली आली पहा माझी 

कशी ही गद्दे पासष्टी ||१|| 


वय हे वाढत गेले 

केली आयुष्या धमाल 

ढकलत राही दिस

कसे जाईल हे साल ||२|| 


साठी बुद्धी होई नाठी 

घेतली आधारा काठी 

झटत राही जीवनी 

इतरांच्या हितासाठी ||३|| 


दाही दिशा गाजवले 

नाव लौकिकास आला 

जगणे झाले कठीण 

पहा सूर्य मावळला ||४|| 


प्रेम सदैव वाहिले 

सार्थकी लागे जीवन 

हात जोडी परमेश्वरा 

नको फिरू वणवण ||५|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy