हृदयाची धडधड.....
हृदयाची धडधड.....
ध्यानी मनी वाटतंय चिंतन
स्वप्नी ऋणी अबोल मंथन
हृदयात फक्त धडधड नंदन
हे प्रेम आहे की केवळ स्पंदन.....
माझे शब्द आहे वेडे जनार्दन
थोडे सोनेरी अन थोडे चंदन
मुलींपुढे न टिकणार माझं मन
हे प्रेम आहे की केवळ स्पंदन.....
माझं हृदय बनलंय गुलाम नंदन
आठवणीत कुणाच्या जुळवतोय बंधन
मनात आहे अबोली अन थोडी धंधन
हे प्रेम आहे की केवळ स्पंदन.....
घाम आलाय शरीरभर मंधन
डोळे झालेय लाल जनार्धन
ओठ सुखलेय थोडे भनभण
हे प्रेम आहे की केवळ स्पंदन.....
भीतीने डॉक्टरजवळ गेलो धंधन
सांगितली व्यथा थोडी चटकन
म्हटलं दया उत्तर आता यावर भणभन
हे प्रेम आहे की केवळ स्पंदन.....
डॉक्टर म्हणे "हे प्रेम नाही हे केवळ स्पंदन
हार्ट अटॅक आलाय तुम्हाला धडकन
ऍडमिट व्हा मी उपचार करतो चटकन
नाहीतर थोडा वेळ झाला तर मराल गचकन "
तेव्हा मी सुद्धा समजलो हे प्रेम नाही की केवळ स्पंदन....
हे प्रेम नाही की केवळ स्पंदन.....
