गोरी बायको कशासाठी?
गोरी बायको कशासाठी?
बायको केली गोरी गोरी
नखरे तीचे लयभारी!!
फुग्गा बनून फुगते अशी!!
अदा तिची सर्वात न्यारी!!
लिपस्टीक पावडर लावते
मेकअप जास्त करते!!
सोंदर्याची खाण अशी ती
फिरायला जायचा हट्ट धरते!!
स्वयपाकला असे रोज सुट्टी
बाहेरून पार्सल मागवते!!
फोनवर सतत राहून
गप्पा ही सतत मारते!!
रोज नवीन ट्रेस घालून
सगळीकडे मिरवते!!
तिच्या इशाऱ्यावर
मला रोज फिरवते!!
गोरी बायको कशाला??
प्रश्न पडला हा मला!!
नको रोज उपासमार
कोसतो मी आता स्वतःला!!
