STORYMIRROR

Umakant Kale

Inspirational

4  

Umakant Kale

Inspirational

कधी दिसणार कळस

कधी दिसणार कळस

1 min
7

*घेऊन शब्दाची वारी ...करतो पंढरीची वारी...या सदरातून रोज नित्य लेखन....* कधी दिसणार तो कळस आसुरले मन माझे आता कधी दिसणार तो कळस.. धर्म पताका शिखरी हरी मुखें म्हणा बस... नाही निती, रित जगी कर्म बोले सदा येथी नाही देवा मी रं योगी चाले नाम तुझे येथी... तमा नाही या जीवाला ऊन वारा संगी खेळ नाही रं जातीपातीचं ऊरे भक्तीचा रं मेळ..। नाही वाचून मी शास्त्र नाही अभ्यास वैदाचा मनी भावला तो धर्म देवा हा माणवतेचा.. हाती भगवा तो ध्वज टाळ मृदंग वाजती पाय न थकता चाले दर मजल करती... रस्त्यावर त्या लाबच रागा , रांगेत मी चाले कुठे तुकोबा ज्ञानबा वारकरी असा बोले.. असमंत दुमजली विठ्ठू नामें ती पोहची काय लहान ती मोठे हाक देवाला पोहची... @उमाकांत काळे,अकोला 📱९९२२८५५५३९ https://umakantk23.blogspot.com/?m=1


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational