STORYMIRROR

Umakant Kale

Inspirational

4  

Umakant Kale

Inspirational

लागली ओढ पंढरीची

लागली ओढ पंढरीची

1 min
9

*घेऊन शब्दाची वारी ...करतो पंढरीची वारी...या सदरातून रोज नित्य लेखन....* लागली ओढ पंढरीची टाळ चिपळ्या रं हाती शेला बांधला मी कटी आता मी घेतली झोळी येतो चंद्रभागा काटी.. विठ्ठू नामाचा गजर मनाला लागे भुरळ उभा माझा मायबाप लागे भेटीची वर्दळ.. नामा तुका जनाबाई कुठे सावता ही भेटी ज्ञानेश्वर ती माऊली संत मिलनाच्या गाठी... दिसे मला हो पंढरी हरी ओढ किती मनी पायी चालत मी असा जपे मुखी नाम मनी... आषाढीच्या सोहळ्यात दंग मला रं व्हायचे संत माहेरा नाचूनी विठ्ठू नामी रमायचे... वारकरी पंढरीचा काही दिवसांची गोष्ट हल्ली मुक्काम ठोकला ऐकी भक्तीची ती गोष्ट... ✍️उमाकांत काळे,अकोला 📱९९२२८५५५३९ https://umakantk23.blogspot.com/?m=1


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational