STORYMIRROR

Charushila Dhumal

Inspirational

3  

Charushila Dhumal

Inspirational

हरवली पाखरं

हरवली पाखरं

1 min
26.5K


शिकून सवरून मोठं केलं

जीवाचा केला आकांत !!

तारेवरची कसरत करून 

मुलांना उच्च शिक्षण दिलं!!


जीवाचा आटापिटा करून 

आई बाबांनी पंखात बळ भरलं 

आकाशाला गवसणी

घालायला शिकवलं!! 


उंच भरारी घेऊन दुरी,

आतापाखरं हरवून गेली !!

घराचं घरटं सोडून ,

विदेशी उडून गेली !!


म्हातारपणाची हरवली काठी 

ही रुखरुख लागली जिव्हारी!!

आठवणींनी जीव होतो व्याकुळ

आज ममता लाचार झाली !!


माया, प्रेम हरवत चाललं-- 

दुरावत चाललं-- नातं !!

पाखरांनो! हरवून चाललात तुम्ही!

उद्या ,ममतेला व्हाल पारखं!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational