STORYMIRROR

Vineeta Deshpande

Comedy Tragedy

3  

Vineeta Deshpande

Comedy Tragedy

चेकमेट

चेकमेट

1 min
286


या कलियुगात चोहिकडे

स्पर्धेचे खेळ मांडलेले

एक डाव माझा रंगला, या

आयुष्याच्या सारीपाटावरती

अपेक्षांचे घोडे दौडतात

आकांक्षाचे उंट चालती

नेहमी तिरकी चाल

पैशांचा हत्ती चाले ऐटीत

सामंजस्याचा वजीर देतो

सदा साथ जरी मज

सोडतो साथ एकेक प्यादा

शेवटी देतो मी चेकमेट अन

मी राजा डाव हा जिंकतो,

टाळ्यांसाठी वळून बघता

सारीपाट रिकामा असतो.

कधी जिंकलो म्हणून

परत जिंकण्यासाठी

कधी हरलो म्हणून

जिंकण्यासाठी,

पुन्हा पुन्हा मांडतो डाव नवा मी

पुन्हा पुन्हा मांडतो डाव नवा मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy