STORYMIRROR

Vineeta Deshpande

Fantasy

3  

Vineeta Deshpande

Fantasy

क्षण

क्षण

1 min
604

आयुष्यभर जगण्याचे अगणित

कण आपण वेचत असतो

हे वेचत असताना

किती तरी आनंदाचे क्षण

नकळत निसटून जातात

हे निसटलेले क्षण परत

मिळविण्याच्या नादात

"आजचा क्षण " हरवून जातो

मग या हरवलेल्या अनेक क्षणांना

कवटाळून दुःख करत बसतो.

एकदाच मिळालेले हे आयुष्य

सार्थ करण्यासाठी

येणारा प्रत्येक क्षण

काय घेऊन येतो,

काय देऊन जातो

याचा हिशेब ठेवण्यापेक्षा

तो क्षण मनसोक्त जगायचा असतो

प्रत्येक क्षणात जगण्याची

मौज असते, ती ज्याची त्यांनी

अनुभवायची असते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy