काळा मागून ये ना बाबा
काळा मागून ये ना बाबा
काळ लोटून ये ना बाबा
खेळणी मला दे ना बाबा
खेळणी कुठे हरवली कशी
खेळ खेळूंत बस ना बाबा
तुझ्याशी खूप बोलायाचे
फोन मला तू कर ना बाबा
घर आता मी छान बांधले
येवून जरा बघ ना बाबा
नात तुझी रे हाका मारी
नातीसंगे फिर ना बाबा
पाऊस खूप आला भारी
पाण्यात खेळू चल ना बाबा
संध्याकाळी मला बघूनी
खळखळून तू हस ना बाबा
खूप एकटे वाटते मला
मिठीत तुझ्या घे ना बाबा
