कुस
कुस
तू आयुष्यात आलीस, आणी सगळं बदललं.
खूप काही हरवत गेलो होतो, सार काय ते सापडलं.
सापडल्या त्या आठवणी, आनंद आणि बालपण.
सुटली होती झोप आणी तुटली होती स्वप्न, तेव्हा दिले होते वचन.
योग असो वा ठराव, त्या मावळत्या सूर्याचा शेवट.
पहाट पुन्हा तूच होशील, फक्त विरह झोपेचा सावट.
सहज आठवलं आणी पाहिलं, पावले सोबत चालतायत.
स्मशान शांततेत का होईना, आपले पायताण बोलतायत.
वर्चस्व म्हणू की सर्वस्व, साथ तुझी झाली.
आयुष्याने आयुष्याची आयुष्याशी, गाठ अशी मारली.
नव्हतं माहीत की जाणीव कसली, तुझ्या या येण्याची.
कागदावरती थकली माझी, लेखणी त्या मेण्याची.
आनंद झाला आकाश ठेंगणें, साऱ्या काही या खुशीत.
शेवट व्हावा तुझ्या सोबती, निद्रा तुझ्या कुशीत.

