STORYMIRROR

Neelam Rane

Fantasy Inspirational

3  

Neelam Rane

Fantasy Inspirational

तो ठिपका

तो ठिपका

1 min
214

एक ठिपका प्रकाशाचा आला 

मिट्ट अंधाराला भेदत

राहिला घट्ट उभा अचल

डोळे घट्ट झाकून घेतले

अडवण्याचा केविलवाणा प्रयत्न

तो तितकाच हट्टी जाईना मुळी

सारे दरवाजे बंद मग आल़ा कुठून

की आहे तिथे तो शुष्क कोपरा 

थेंबाच्या आवाजालाही आसावलेला


नकोच होती त्याची ही घुसखोरी

की होतच त्याचेअस्तित्व कायम तिथे

पटलावरच्या आवरणाला ठेवलेल्या 

छिद्राएवढेच अंतर होते ते

ऐलतीरावरुन पैलतीरावर पोहोचण्याकरता


मोह नव्हता पाशातही अडकणार नव्हते

तरी ध्यास लागलाच ना

धडपडत अडखळत

त्या ठिपक्या पलीकडचे शोधण्याकरता

हलक्याफुलक्या फुंकरीचा आधारच मिळाला जसा मिटलेली कळी खुलायला

आणि स्वतःच अडकलेला तो भ्रमर 

निघाला परत जीवन रस शोधायला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy