कर्तव्य
कर्तव्य


प्रत्येकाला कृष्णासारखे स्वतःच्या कंसाला स्वतःच मारावे लागते
नाहीतर तो पुढे शिशुपाल होऊन छळतो
त्याचे अपराध शंभरी केंव्हाच पार करतात
आणि आपण नुसतं मोजत राहातो
पुढे ते इतके फोपावतात जसे शंभर कौरव
सत्याला पायदळी तुडवणारे
डीवचून रक्तबंबाळ करणारे
बेलगाम दुर्योधनासारखे अहंकारी
शिखंडीसारखे वळणावर लपून प्रहार करणारे
धृतराष्ट्रासम सत्तालोलुप असणारे
शकुनीसारखे भीषण कपट करणारे
कृष्णासारखे निसंग होता येत नाही सर्वानाच
म्हणून कृष्णासारखे सारथ्य मिळावे लागते
एखाद्या अर्जुनाला भावनांवर कर्तव्याचे
कवच चढवण्याकरता