तीर्थ विठ्ठल
तीर्थ विठ्ठल
1 min
328
वाहते नित्य भक्तीधारा चक्षुसमोरुनी
कुणी मंदिरात तर कुणी वारीच्या वाटेवरी
कौतुके न्याहाळतो तव दुरुनी तेव्हा
दिठीतुनी आत्म्यात झिरपते तुझेच गोजिरे रुप
चिंधीसाठी वस्त्र पुरविसी कृष्णेस
मैत्रीसाठी पोहे तुज गोड सुदाम्याचे
भक्तीसाठी युगे उभा दारात पुंडलिकाच्या
धर्मयुद्धी तिथे तूच सारथी या पार्था
धारेच्या विरुद्ध तरीही तुलाच उमजली राधा
वारी व्रत वैकल्यै नाही केली
हा हरी तो हर मिथ्या फरक नाही केला
कर्मकांडात व्यग्र राहिलो तरी
धरूनी भाव मनी जिथे तुज पुजिला
गवसलासी तिथेच आम्हा तू संसार पंढरीत
