राखी
राखी


राखी फक्त बहिणीने भावाला बांधावी का
जो न राखी तिचे मोल कर्ता झाल्यावर
एक प्रथा म्हणून ओवाळून घेई
प्रसंगी वाऱ्यावर सोडी बहिणीला
दूर राही मनानेही माहेरघरी
धनाची वाटेकरी होईल म्हणून
हे विसरून की ती प्रसंगी ढाल होते
अन्नपुर्णा होते मायेने घास भरवताना
स्वतःवर बंधने लादून घेते
त्याच्यावर संस्कार करताना
कौतुकाने पाठीवर थाप देते तेव्हा
नुसती ताई या हाकेने डोळे भरणारी
कसा आहेस विचारताना त्याच्या
काळजीची तळमळ ओठात लपवणारी
कधीतरी भावानेही बांधावी राखी
तिचे प्रेम आठवून
ती मात्र जन्मतःच
स्वतःच राखी बांधून घेते
मनाने त्याच्या रक्षणाची