STORYMIRROR

kishor zote

Fantasy

3  

kishor zote

Fantasy

आठवणींच्या हिंदोळ्यावर

आठवणींच्या हिंदोळ्यावर

1 min
924


या आठवणींच्या

हो हिंदोळ्यावर

होते वर खाली

मन खाली वर


फुंकर घालते

हसू पळभर

दुःख लपवते

घालता जागर


ओझे अपेक्षांचे

चढे सरसर

फुकाची निराशा

रिकामा पदर


शब्दच बोचरे

शब्दांनाच धार

होतात किती हे

आघात कठोर


हेलवते मन

तरी हो खंबीर

खुपसतो कोणी

पाठीत खंजीर


हातून सटकतो

क्षण भरपूर

हिशोब कुठला

राहतो उधार


हात जोडतांना

झुकते नजर

आपण आपले

जगावे सुंदर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy