STORYMIRROR

Kshitija Bapat

Fantasy

5.0  

Kshitija Bapat

Fantasy

लावण्यात नाहते मी

लावण्यात नाहते मी

1 min
266

रूप माझे सोज्वळ

रंग माझा उज्वळ

बदामी ग माझे डोळेे

काजळाने केले काळेे


आली गालावर बट

केसांची माझ्या लट

ओठ माझे लालबुंद

यौवनात मी धुंद


लाल लाली गालावर

काळातील ओठांवर

केस काळे मऊशार

केला मी सोळा शृंगार


लावण्याची खाणही

लावण्यातच नहाते मी

आरशात पाहतेे मी

बाहुपाशात तुझ्या मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy