शब्दांची नगरी
शब्दांची नगरी
शब्द ही संपत्ती
शब्द हीच उत्पत्ती
शब्दा वाचून
कोण रे शिकला
शब्द शिकूनच तर
तो ही पिकला
शब्द शिकून झाला मोठा
केरीतला कचरा छोटा
आता जगला
समजून चुकला
या शब्दांच्या नगरीत
भव्य तुझ स्वागत
बघतोस काय
अस वाकत वाकत
शब्दात हाय
लय मोठी ताकत
जाऊ नको वाटेला
या पूनवेच्या पहाटेला
शब्द संपत्ती म्हणजे
खर हे सोनं
चोरुन नेणार नाही कुणी
तुझ हे लेण
शब्दावर कर प्रेम
शब्दावर कर माया
शब्दच देतील नेम
नी शब्दच देतील छाया
काळोख्या रातीतून
बाहेर तुला रे काढती
कधी तू स्वर्गात पोहचला
तुलाच न कळती
मागे वळून बघशील तर
दिसेल तुला अंधकार
बघ समोर
जग किती आहे धुंवाधार
शब्दाची नगरी सोण्यान फुलली
वेलीन बहरली, फळान साजली
अशी ती लाजली
अमृत मला पाजली
रूपवान ती, लय चमकते
मला पाहून, जाते हुरळून
मंद स्मित, हास्य करते
मला बघून, मला बघून
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

