नवीन वर्ष
नवीन वर्ष
घेऊन आनंदी वातावरण
केले जुन्या वर्षाचे हस्तांतरण
नवीन वर्ष आला हो
आनंद खुप झाला हो
जुन्या आठवणी खोल जखमा
विसरा तुम्ही आता हो
नवीन वर्षाचे स्वागत करा
ठेवुनी मनी नवे विचार हो
असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
आनंदाला वाटावा तुमचा हेवा
घ्या तुम्ही श्वास तवा
कराल जेव्हा संकल्प नवा हो
करा दुर्व्यासानाची होळी
सोडा तुम्ही दारू बिडी
पेरा तुम्ही बीज तवा
ठेवाल जेव्हा ध्यास नवा हो
