Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

सुरेश उजाग्र

Inspirational Others

4.0  

सुरेश उजाग्र

Inspirational Others

आई

आई

1 min
229


आई ए आई

तू ग माझी माई


तुच माझी गुरू पहिला

प्रथम तुज वंदितो

करतो माते नमन तुझला

गान तुझे मी गातो


करतो चरण स्पर्श तुझे ग

तुलाच मी मानतो

ध्यानी मनी तुच असते

तुझ्याविना मी ना जगतो


आई तुच स्वर मंजुळा

तुच ग रण रागिनी

असंख्य रूप असती तुझे

तुच ग मा भवानी


आई तुझी मी पूजा करतो

तुलाच सगळ अर्पण करतो

मागत नाही तुला काही

तुच माझं सर्व पाही


तू ग असता सर्व मिळते

तू नसता मन मळमळते

तुझी ग चिंता मजला असते

तू नसता मला करमत नसते


आई तू ग भाग्यविधता

तूच माझी जन्मदाता

तुझी ग मूर्ती जगभर कीर्ती

तुझ्या ग पुढे सर्व जग फिरती


आई तू ग कृपा माऊली

तुझी सावली आम्हा

करतो तुझ्यावर प्रेम आम्ही

काय हवे ते आम्हा सांगा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational