STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

4  

Trupti Naware

Inspirational

झोका

झोका

1 min
28.7K


झाडावरचा झोका

एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला ..

थोडाच अवधी लागतो

त्या मधल्या अवधीत

सारे मागचे झोके

स्मृतीगंधासारखे सोबत वाहु लागतात...

शेवटच्या टोकाच्या बिंदूला

श्वास थोडा थांबल्यासारखा

परत माघारी येताना

खेचुन कंठाशी आल्यासारखा

त्या झोक्याची उंची ही

लांबच लांब होते, नदीसारखी

आकुंचन पावते लगेच

आटलेल्या कोरड्या पाञासारखी

पण कधी कधी ..मंद मंद

सुखावणारा..,आवडणारा

कवेत घेवून मिठीत विसावणारा

हलकेच एका पायाच्या धक्क्यानेही

सुगंधी वाऱ्यात मिसळणारा

हा झोका अलवार

आकाशाच्या पाऊलवाटेचा

हळुवार जमीनीवर थांबतो

नि आपोआपच अंगावरुन

शहाराही लाजतो...

मनाचा झोका माञ

वेदनेच्या पंखावरुन

सुखाच्या घरट्यात यायला

फार अवधी लागतो ..

त्या मधल्या अवधीत

मनाचा दोर

कधी सैल होताना हसतो..

तर कधी कधी

संयमाच्या सावलीतही

ग्रिष्मासारखा बोचतो !!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational