STORYMIRROR

Kavita Pudale

Inspirational

4  

Kavita Pudale

Inspirational

संवाद

संवाद

1 min
30.2K


सांगा ना आई बाबा.....

तुम्हाबरोबर सुसंवाद कधी घडायचे..

मज नको शिक्षणाचे ओझे..

मज हवे आवडते शिक्षण माझे..

मज हवे ध्येय माझे

नको अपेक्षांचे ओझे..

मज हवे माझेच स्वप्न "


" माझे स्वप्न आहे यशाचे..

ते तुम्हाला नाही समजायचे..

मला अज्ञानाशी झुंजायचे..

ते तुम्हाला कधी कळायचे..

कधी मलाही विचारा ना..

तुला काय व्हायचे..


आई बाबा तुम्हाला काही सांगायचे..

तुमचे माझे मैत्रीचे नाते कधी जमायचे..

तुमच्यात माझ्यात सुसंवाद कधी घडायचे..

म्हणूनच म्हणतो , नको मला अपेक्षाचे ओझे..

मलाही काहीतरी व्हायचे..

हे तुम्ही कधी मला पुसायचे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational