STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

4  

Trupti Naware

Inspirational

पाणी

पाणी

1 min
29.7K


पाण्यावर पाण्याच्या

थेंबाची रांगोळी ..

पाण्यावर पाण्याच्या

वाफेची होते होळी..

संथ, निःशब्द असतो तरंग

तरी हलणार ... बोलकं

त्यात दिसतं प्रतिबींब

त्याला स्पर्शून वाराही

शहारुन गेला ..

त्याला बिलगून जलधाराही

तृप्त होवून गेल्या

ते दर्पण बनले

चंदेरी चंद्राचे

पुनवेला झाले शिंपण

त्यात टिमटिमत्या चांदण्यांचे

ते शितल..ते स्वच्छ

तृषातृप्त करणारे

क्षण बनले आनंदाचे

ओंजळीत साठताच

पाणी झऱ्याचे

क्षणात झाले ते

प्रवाह धरणीचे

निर-जल-उदक यांस

प्रेमाने असते म्हणायचे

पण पाणी खरं तर

दुसरे नाव असते जीवनाचे ..!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational