STORYMIRROR

Amol Tarte

Inspirational

4  

Amol Tarte

Inspirational

समाज

समाज

1 min
27.6K


समाज समाज आपण नेहमीच ऐकतो,

आज तो एक आटलेला तलाव दिसतो.!!

कोणाचं कोणाशी काही देणं घेणं नाही,

कारण प्रत्येकाचं मन पिंजऱ्यात बंदिवान दिसते,

तेथे असतो फक्त दांभिकतेचा अवडंबर...||1||

किती हो भावनांचं नाते जोडलेलं,

का दिसत नाही हो समाजात,

एका चिमुकालीच्या देहावर पडलेल्या असतात वासनेच्या नजरा..||2||

इथे प्रत्येकाचीच संवेदनशीलता इतकी बोथट, की त्याला नाही कोणाची लागट,

काय करावं त्या छोटया जीवनं,

जेव्हा तिच्या चहू बाजूनं असतात पाशवी नजरा..||3||

आधार असतो समाज एका जीवाचा,

तोच उठला आज तिच्या जीवावर,

कधीच होणार नाही का बदल आपल्या मानसिकतेवर.?||4||

करूया आज आपण एक संकल्प,

देवूया आधार त्या जीवाला,

निर्भीडतेच्या आभाळाखाली मोकळी भरारी मारायला,

आणि म्हणूया..

समाज समाज आपण नेहमीच ऐकतो,

कारण तोच प्रगतीचा आधार असतो..


Rate this content
Log in

More marathi poem from Amol Tarte

Similar marathi poem from Inspirational