STORYMIRROR

Anil Date

Inspirational

4  

Anil Date

Inspirational

हा देह टाकूनी चाललो मी

हा देह टाकूनी चाललो मी

1 min
27.7K


हा देह टाकूनी चाललो मी आता कोणती खंत नाही

जरी ही अखेर माझी माझ्या विचारांचा हा अंत नाही


खेळलो जुगार आयुष्याचा क्षणोक्षणी या धरेवरी

हा डाव माझा शेवटाचा आज तुला का पसंत नाही


मिळाल्या ज्याही मला त्या भूमिकांना मी न्याय देत गेलो

जीवनाच्या रंगमंचावरी मजसा कलावंत नाही


माझा कधीच नव्हता रें दावा परिपूर्ण असल्याचा

मी वाढत गेलो अंशाअंशाने परी मी अनंत नाही


नं देणार उपदेश नं करणार मी भविष्यवाणी

भोळ्याभाबळ्यांना फसविणारा मी तो भोंदू संत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational