STORYMIRROR

सुरेश उजाग्र

Abstract Classics Others

2  

सुरेश उजाग्र

Abstract Classics Others

चांदणे शिंपीत जा

चांदणे शिंपीत जा

1 min
45


चांदणे शिंपीत जा

तू चांदणे शिंपीत जा


या ढगातूनी त्या ढगात तू

रंग हे उधळीत जा


लाल, आकाशी, गुलाबी

चौफेर तू उधळीत जा 


दे प्रकाश या फुलांना

दे प्रकाश या तृणांना


दे प्रकाश फळा फुलांना

दे प्रकाश सकल जणांना


रात्रीच्या या रम्य क्षणी

तू घे जरासा विसावा


दिवसा होई गर्मी फार

संध्या समयी दे तू गार


सकल जणांना

ऊर्जा देऊन कर उपकार

तू आम्हांवरी


दे तू सगळ्यांना रे प्रकाश

ने अंधकरातून ज्ञानाकडे 


तेजोमय तुझे वलय

ठेव तु कृपा आम्हांवर


कर परिक्रमा तू निरंतर

जा पुढे तू कार्य कर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract