आयुष्य हे बनले इंद्रधनुष्याने
आयुष्य हे बनले इंद्रधनुष्याने
चला खेळू या रंग
इंद्रधनुष्याच्या संग
चला उधळूया असे रंग
मस्तीत होऊ सारे दंग
आयुष्य हे बनले सप्तसुराने
आयुष्य हे बनले इंद्रधनुष्याने
नका ठेवू मनात कलह
तो तर भांडणाचा वलय
धैर्य, शौर्याने आयुष्य घडते
सुख दुःखाने आयुष्य बनते
प्रेम शांतीने जीवन फुलते
त्याग समर्पणाने जीवन बहरते
पिवळा रंग आनंदाचा
हिरवा रंग प्रकृतीचा
केशरी रंग क्रांतीचा
पांढरा रंग रे शांतीचा
निळा रंग आकाशी
रंग नसे पाण्याशी
बना तुम्ही रे नदीशी
प्रवाही बना रे जनाशी
सूर्य किरणामध्ये सप्तरंग
पाण्यामुळे इंद्रधनुष्य
दिसतो तो मोहक
मनाला भावे तो मनमोहक
ठेवू जीवनी आपुलकी जिव्हाळा
हृदय असते रे कोवळा
तुम्ही त्याला रे सांभाळा
मन आहे हा हळवा
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
