STORYMIRROR

Anil Date

Inspirational

4  

Anil Date

Inspirational

वारंवार

वारंवार

1 min
27.1K


अपराध हा आजन्म मी केला वारंवार

विश्वास प्रत्येकावर ठेवला वारंवार


मी असतो तसा चर्चेत नेहमीच त्यांच्या

पण दुरावा मनात राहीला वारंवार


जीवना किमया ही तुझी मला नं कळली

तो डाव हारलेला मी जिंकला वारंवार


तूं जा निघूनी हलकेच चोरपावलांनी

जीव माझा तुजवरी भावला वारंवार


आता कुठे कविता माझी भारदस्त झाली

ठाव तुझ्या मनाचा तीने घेतला वारंवार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational