STORYMIRROR

Anil Date

Inspirational

4  

Anil Date

Inspirational

मशाल

मशाल

1 min
28.2K


एकतेचा सूर

ऐके नाही कुणी

करी प्राणहानी

जातीपायी


माणसाच्या वस्त्या

रिकाम्या झाल्यात

वसन्या आल्यात

जातीसंस्था


फुलला नं कधी

माणसाचा मळा

दानवाचा मेळा

भरला रे


गाणार का कुणी

एकतेची गाथा

टेकवून माथा

समतेला


घेवून हातात

क्रांतीची मशाल

घडवू विशाल

भारताला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational