STORYMIRROR

Anil Date

Inspirational

4  

Anil Date

Inspirational

देहभान

देहभान

1 min
27.3K


सांग सखे खरं मला तुझ्या मनातलं

मी ओळखलं प्रेम तुझ्या नयनातलं


हा लपंडाव ऊन पावसाचा की तुझा

कोडं हे मला नं कळलं श्रावणातलं


फिरतो ऐसा मी रोज तुझ्या मागंपुढं

दिशाहीन पाखरू जसं गगनातलं


सारून बंधने जगाची तूं माझी झाली

होईल का वास्तव हे कधी स्वप्नातलं


विसरली तूही सखे देहभान तेव्हा

शरीर माझं पाहीलं जेंव्हा सरणातलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational