STORYMIRROR

Anil Date

Inspirational

4  

Anil Date

Inspirational

मूर्ती सौंदर्याची

मूर्ती सौंदर्याची

1 min
27.2K


कमलनयनी

नाक चाफेकळी

गालावर खळी

नित्य असे


केसातून येतो

मोगर्याचा गंध

करी मज धुंद

रुप तुझे


ओठांवर माझ्या

तुझे गीत आहे

हे संगीत आहे

जीवनाचे


तुझी प्रित ऐसी

गुळाहुन गोड

रुसवा हा सोड

सजणी गं


सांग तुला देऊ

उपमा कशाची

मूर्ती सौंदर्याची

आहेस तूं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational