नवस
नवस
एक लेकरू जन्मु दे माझ्या पोटी
लोक म्हणती मला वांजोटी
नवस केला पोरासाठी
पोरगी जन्माला आली पोटी
आईचा आनंद भरून आला
बापाचा चेहरा निस्तेज झाला
देवाने नाही दिला वंशाचा दिवा
का म्हणून देवावर विश्वास ठेवा?
पोराचा ईचार आता मणी नका धरू
पोरगीच आपला आधार,संसार सुखानं करू
नवस आपला खोटा,आपण लई पुन्यवान
लक्ष्मी आली घरी,झालो आपून धनवान
पोरग-पोरगी आज हाय व समान
लई शिकवू पोरीला,वाढविल आपला अभिमान
पोरापाई का वाचता पुरान-पोथी
पोरगीच खरी हाय वंशाची ज्योती
वंशाचा दिवा म्हणून, पोराचाचं का करता विचार
पोरगीच करते दोन्ही घरचे स्वप्न साकार.
