घरटे चिमणीचे
घरटे चिमणीचे
घरटे चिमणीचे, नका मोडू कोणी
बनवा घरटे नवे,विनंती हात जोडून दोन्ही...!!
दाणे ठेवा दारी,येईल चिमणीची स्वारी
एक एक दाणे टिपण्यासाठी फिरते बिचारी...!!
शिकवा बालकांना पक्ष्यांना आधार द्यायला
छोट्या छोट्या हातांनी दाणापाणी ठेवायला....!!
अनुभवातून ज्ञान मिळते,तेच खरे ठरेल ज्ञान
पशू पक्ष्यांचे निरीक्षणांने मिळवील ज्ञान छान...!!
सान असो वा थोर, खूप झाडे झुडे लावा
हिरव्यागार झाडांवरती बसेल पक्ष्यांचा थवा...!!
चिमण्यांची चिवचिवाट होता,मन येईल भरून
दिवसांमागे दिवस जातील, हे ही कोरोनाचे सरून...!!
माणसं झाली घरातमध्ये आता सर्वत्रच बंद
पुन्हा एकदा बोध घेत घरटी बांधण्याचा छंद...!!
चिमणीचे घरटे माझ्या नका कोणी तोडू बाई
पिलासाठी झटत असते ती पण एक आई.....!!
एक एक दाणे टिपती,येते सर्रकन घरट्यात
जोपर्यंत पहात नाही पिलांना, येतो जीव जीवात...!!