जसं दिसतं तसं नसतं
जसं दिसतं तसं नसतं
अगणित माणसांचे फसवे चेहरे
कोण आपला, कोण परका
लक्षात येत नाही, मग मनातली
तगमग किती वेळ रोखून धरणार?
खरं सांगायचं तर मला वाटलं नाही
तू इतका मनमोकळ्या स्वभावाचा असशील
एवढा अवाढव्य, गंभीर अन रागीट,
कायम माणसांच्या दूर दूर रहाणारा
आई शप्पथ, तुझा आंडदाणपणा पाहून
माझ्या मनातलं तुझ्याशी निर्भयपणे
बोलता येईल वाटलं नाही रे मित्रा
म्हणतात ना, दिसतं तसं नसतं
म्हणून जग फसतं,
माझं तसंच झालं बघ,
अधूनमधून
असंच भेटत राहू आपण
खळखळून हसत राहू आपण
एकमेकांना समजून घेऊ आपण
विनीता देशपांडे
