STORYMIRROR

Vimal Patkari

Fantasy

3  

Vimal Patkari

Fantasy

स्वप्नातली कविता !

स्वप्नातली कविता !

1 min
252

एकदा कविता 

आली माझ्या स्वप्नात 

मला म्हणाली,

"येतेस का माझ्या विश्वात? "

ऐकून तिच्या या प्रश्नास

अवाक् झाले मी मनात!

मग तीच म्हणाली मला 

"का गं,एवढी का पडलीस विचारांत ?"

मी म्हणाले,

"नाही ग बाई तसं काही नाही.

पण हे बघ,

तुझा अन् माझा जुळणार नाही ताळमेळ 

तुला नटवण्यासाठी मला नाही वेळ 

 अन् मला जमणार नाही तुझ्या अलंकारीक शब्दांचा खेळ."

यावर ती म्हणाली,

"अगं, कवी - कवयित्री मला नटवताय तशी मी नटते

सजवताय तशी मी सजते

पण त्यामुळे मी फक्त कळणाऱ्यांनाच कळते.

म्हणून मला तू देवू नकोस अलंकारांचा साज

दे मला तू साध्या, सोप्या शब्दांची साथ

अन् मग बघ माझी सरळ, सोपी साद

प्रत्येकाच्या मनास कळेल हमखास!"

मी डोळे उघडून पाहिलं तर 

माझ्या मनातील विचार 

हातातील कागदावर 

लेखणीनं घेत शब्दांचा आकार 

साधी, सोपी माझी कविता 

झाली होती साकार!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy