कागदाचा तुकडा
कागदाचा तुकडा
किती उपयोगी हा
कागदाचा तुकडा
प्रत्येक कागद हा असतोच
वेगळा वेगळा
घेता विचारांची उंच भरारी
पांढऱ्या शुभ्र कागदावर
उमटते जेव्हा निळ्या, लाल विविध रंगाची शाई
उमटलेल प्रत्येक अक्षर कागदाला अर्थ प्राप्त करून देतो
अर्थ सफल झाला तर कागदाचा
तुकडा अन् तुकडा जपला जातो
अन्यथा केराच्या टोपलीत तो टाकला जातो...
आपल्याला कुठे वेगळे अस्तित्व असते....
सारं काही कागदावरच आणि
कागदासाठी तर चाललं असते
कधीकधी शुल्लक वाटणारा कागदाचा तुकडा
आपले चारित्र्य, दैनंदिन व्यवहार पार पाडतो
हा कागद कधी प्रशंसेचा कधी परखड बोलाचा
कधी कायद्यायचा तर कधी वायद्याचा असतो
प्रेमाचे चार शब्द लिहले की होते प्रेम पत्र
घडामोडी, बातम्या छापल्या की होते वर्तमानपत्र
लेखणीच्या माध्यमातून मनाच्या कल्पनेचे शब्द
हा कागदच तर करतो एकत्र
माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर...
एक आवड होती लिहिण्याची मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरण्याची 🗂️🖊️
वाटलं नव्हतं कधी मी लिहू शकेल
लिहिण्यासाठी सतत काही ना काही विचार करत बसेल
मग काय...
चंचल मनाची चंचलता करी शब्दांचा सखोल विचार
कविता फक्त कविता नसावी असावे त्यात सुंदर भाव म्हणून सुंदर कविता बनवण्यासाठी लागली सोबतीला शब्द संग्रहाची वखार...
पांढर्याशुभ्र कागदावर उतरवले मनातील भाव .
कागदावर उमटलेली अक्षरे कधी निर्माण करी छंद
कधी देई नवा आनंद कधी आनंदाचे समाधान..
मनातील भाव,शब्द कागदावर लिहिण्यासाठी मग
हरवून जाई मन सुटसुटीत लेख, कविता व्हावी
यासाठी शोधावा लागला
मग निवांत क्षण...
आपलं अस्तित्वच कागदावरच
कागदाचा महिमा अपरंपार,खरंच
कागदाचा तुकडा आहे महान
ठरवितो आपल्या जन्म मृत्यू चे स्थान
होता गर्दी मनी तुडुंब भावनांची
व्यक्त होण्या भासे गरज या कोऱ्या कागदाच्या तुकड्याची अव्यक्त मी व्यक्त होत जाई नसता सोबती कोणी
मिळे साथ तेव्हा या कोऱ्या कागदाची...
म्हणूनच कागद जपावा
कागद कमवावा आणि जाता जाता
स्वकर्तृत्वाचा कागद येथे सोडून द्यावा..😊
