साईबाबा बोलो
साईबाबा बोलो
साईबाबा बोलो
बोलो साई बाबा SS ,
शिर्डी वाले बाबा SS
आलो तुझ्या भेटीला,
चरणी माथा ठेविला,
कृपा करी आम्हावरी
भक्त जमले हो दरबारी ||
बोलो साईबाबा SS
शिर्डी वाले बाबा SS
राहिलास कुटीत,
साध्या तू वेशात,
प्रसाद बेसन भाकरी
खाती चवीने सारी ||
बोलो साईबाबा SS
शिर्डीवाले बाबा SS
अंगावरी शाल,
डोक्याला रुमाल
हातात काठी धरशी,
राही दीन दुबाळ्याशी ||
बोलो साईबाबा SS
शिर्डीवाले बाबा SS
लावलेस दीप रस्त्याने
तुझ्या दिव्यत्वाने,
उजळली शिर्डी नगरी,
भक्त जमती गुरुवारी ||
बोलो साईबाबा SS
शिर्डी वाले बाबा SS