Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jaya Nere

Children

2  

Jaya Nere

Children

सण हा पोळ्याचा

सण हा पोळ्याचा

1 min
6.9K

धवळ्या न् पवळ्याची जोडी बघा सजली रे

अन् कशी, मिरवणूक बघा  निघाली ||धृ||

गळ्यात घुंगुर माळ,

पाठीवर नक्षीदार झुलं,

रंगीबेरंगी गोंडे हे छान,

बघा शिंगे ही रंगली रंगानं,

जोडी निघाली बघा जोमानं,

कसा रुबाब आज पहा रं,

अन् सर्व गावात जल्लोष झाला रं ||१||

सर्व नाचती लहान थोर,

चौघडा हा वाजे घण घोर,

किती आहे हो त्यांचे उपकार,

बळीराजाचा तोच आधार,

जिवाभावाचा मैतर तू रं

नाही कष्टाची त्याची सिमा रं ||२||

सर्व घरात गोड धोड अन्न,

सारे दिसतात बघा प्रसन्न ,

साजरा केला वाढदिवस छान,

केले पूजन अन् औक्षण,

नैवेद्य असे हो गोड पुरण,

त्याच्या कष्टाची ठेवा हो जाण रं,

अन् टिकवा मराठ मोळी शान रं ||३||

धवळ्या न् पवळ्याची जोडी बघा सजली रं,

अन् कशी, मिरवणूक बघा निघाली.

Rate this content
Log in

Similar marathi poem from Children