Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Jaya Nere

Inspirational

2  

Jaya Nere

Inspirational

कविता-आई

कविता-आई

1 min
1.2K


कधी माझी ती झोळी झाले,

तर कधी माझ्या गालावरची खळी झाले || 

कौतुक तिला माझ्या खेळण्याचे,

तसेच माझ्या हसण्या बागडण्याचे || 

काऊ,चिऊचा माझ्या साठी केला घास,

आणि स्वतः केला तिने माझ्या साठी उपवास ||

 माझ्या ज्ञानासाठी रात्र ,रात्र जागली,

स्वतः जळली, प्रकाश माझा झाली

 माझे सुख हेच तिचे स्वप्नं,

त्यासाठी रात्रदिवस तिचे खपणं || 

ऊन, वा-यात, सावली झाली, 

अन् स्वतः मात्र ऊन्हात रापली || 

पदराशिवाय तिच्या जगणे माझे नाही,

उदराशिवाय तिच्या जगात माझे  येणे नाही ||

 तिच्या शिवाय जीवसृष्टी नसती, 

अन् तिच्या शिवाय नसती येथे वसती ||

 


Rate this content
Log in