Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Jaya Nere

Inspirational

3  

Jaya Nere

Inspirational

चित्रकाव्य-ओवी रचना

चित्रकाव्य-ओवी रचना

1 min
6.9K


चित्र काव्य-

 

जात्यावरची ओवी

 

जाते बाई जाते गं

गरगर फिरते

पहाटेच्या प्रहरी

दळण दळिते...||धृ||

 

विठू माझा बंधू रे

कधी येशी न्यायला

सासुरवाशिण बहिणीला

कधी नेशिल सणाला..

 

जाते बाई जाते गं....||धृ||

 

दुःख माझ्या जीवनाचे

जात्यात दळिते

विठू माझ्या बंधूला

गा-हाणे सांगते..

 

जाते बाई जाते गं...||धृ||

 

पीठ माझ्या कष्टाचे

जीव त्यात ओतते

मायेच्या ओलाव्याने

भाकरी करिते..

 

जाते बाई जाते गं....||धृ||

 

माहेरच्या प्रेमाला

ओवीत गुंफिते

शीण नसे कष्टाचा

मी ओवीत रमते...

 

जाते बाई जाते गं

गरगर फिरते

पहाटेच्या प्रहरी

दळण दळिते...||धृ||

 

 

 


Rate this content
Log in