Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jaya Nere

Children

2  

Jaya Nere

Children

देशभक्तीपर बालगीत-गान स्वातंत्र्याचे स्मरु

देशभक्तीपर बालगीत-गान स्वातंत्र्याचे स्मरु

1 min
7.7K


देशभक्तीपर- बालगीत

 

    गान स्वातंत्र्याचे

 

अभिमान धरू, बलिदान करू,

देशाच्या स्वातंत्र्याचे, आम्ही गान स्मरू,.. ||धृ||

 

भविष्य आम्ही या देशाचे,

द्योतक आम्ही प्रगतीचे,

करू चला हो काम असे,

नाव उंचवू देशाचे....||१||

 

रक्षण करण्या या धरतीचे,

बाल जवान हो या भूमीचे,

ध्वज उंच धरू या मानाने,

नाव उंचवू बाल शहिदांचे...||२||

 

समजू नका हो सान आम्हांं,

खारीसम या काम करू,

देशभक्तिचे धडे घेउनी,

देशाचे आम्ही रक्षण करू....||३||

 

स्वदेशीचा करू आम्ही प्रचार,

परदेशी मालाचा करू तिरस्कार,

सुजलाम् ,सुफलाम् देश करू

भ्रष्टाचारास सारुनी  दूर ...||४||

 

देशाच्या स्वातंत्र्याचे आम्ही गान स्मरू

 

 

सौ.जया नेरे 

नवापुर जि.नंदुरबार

मोबा.नं-9423918363


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children