STORYMIRROR

Jaya Nere

Children

3  

Jaya Nere

Children

बालगीत -देशभक्तीपर

बालगीत -देशभक्तीपर

1 min
13.9K


 

चला उठा,चला उठा,जावू शाळेला

आज फडकवू तिरंगा आपुला

आज आठवू बाल शहिदांना

स्मरु चला वीर जवानांना

चला उठा....

मनात जागवू देशप्रेमाला

आयुष्य घालवू देशसेवेला

चला उठा.....

उरी बाळगू देशाभिमानाला

ध्वज तिरंगा उंच नेऊ चला

चला उठा....

भ्रष्टतेला नष्ट करु या चला

स्वच्छतेचे धडे गिरवू चला

चला उठा.....

देऊ सलामी राष्ट्रध्वजाला

गान एकतेचे गाऊ या चला

चला उठा....

रंग सारे एक होऊ या चला

मिटवू भिन्नता मिटवू द्वेशाला

चला उठा.....

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children