STORYMIRROR

Sanjana Kamat

Romance

3  

Sanjana Kamat

Romance

नयनांची भाषा

नयनांची भाषा

1 min
230

अजूनही वाटे,तुझ्या प्रेमात पडावे.

आयुष्यात प्रेमात अकुंश नसावे.

कधी खूप हसावे,कधी खूप रडावे.

नयनांची भाषा वाचत, मिठीत रहावे.


तारूण्यात प्रेमात वाहत जात,

उमटतो नाद, हृदयी सारंगीचा.

भवसागराच्या ह्या सागरातून,

साद मिलन स्वरांच्या मैफिलीचा.


चांदण्या रात्री थोडे फिरत राहू,

दोघेही नयनांची भाषा वाचत गाऊं

सारे विसरून क्षणभर ऐकमेकांस,

झेललेल्या सुखदुःखाच्या सरीत न्हाऊं


अबोल जरी नयनांची भाषा,

असे हीच प्रेमाची खरी शिडी.

संसार सुखाने फुलवण्याची,

जीवनातील हीच अनमोल घडी.


ती कातरवेळ ही सजलेली.

सोनेरी रंगी रंगात मिसळलेली.

जणू सोनेरी पहाट आतूर भेट देत,

दोघांच्या श्वासात ती विसावलेली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance