वेड्या प्रेमाचे बोल
वेड्या प्रेमाचे बोल
आरशा समोर उभे राहून स्वत:च स्वत:ला हसते
आजुबाजूला तीला तोच फक्त दिसतो
चार चौघात आसून ही मन एकटेच पडते
हे सगळे वेड्या प्रेमातच घडते
कल्पनेने ही नुसत्या मन शहारते
नाव येताच तोडी काळीज धडधडते
फुलपाखरू होऊन मन बगडते
हे सगळे वेड्या प्रेमातच घडते
पावसाच्या थेंबाना झेलावेसे वाटते
आकाशी उडण्यासाठी मन धडपड़ते
हे सगळे वेड्या प्रेमात च घडते
शब्द शब्द त्याचा झेलावासा वाटतो
हात त्याचा हाती आसावासा वाटतो
दुरून का होईना त्याचा चेहरा दिसवासा वाटतो
आपलाच आहे तो मन स्व:तच ठरवते
हे सगळे वेड्या प्रेमातच घडते

