कधीच वाटत नाही
कधीच वाटत नाही
मला कधीच वाटत नाही
मला सारं सुख मिळाव
फक्त वाटतं दुःखांनी माझ्या
आनंदाला कधीना मिळावं
मला कधीच वाटत नाही
समोरच्यानं मला योग्य समजाव
पण गैरसमज करून
कधी चुकीचं ना ठरवाव
मला कधीच वाटत नाही
मी प्रत्येक वेळी योग्य असेल
पण दिखावा करत
प्रमाणिक मात्र नक्कीच नसेल
मला कधीच वाटत नाही
लोकांनी माझी प्रत्येक वेळी साथ द्यावी
पण छोट्याशा स्वार्थासाठी
नाती मात्र ना तोडावी