पुरावा
पुरावा
किती वेळा देऊ मी,
माझ्या निर्मळपणाचा पुरावा
विश्वास थोडा तरी,
स्वतःच्या माणसांवर असावा
निष्कपट आहे मैत्री,
त्याबद्दल मनात संशय न करावा
थकून गेले शेवटी,
प्रयत्न करूनही कसा जिव्हाळा रहावा
समजवण्यात अर्थ नाही,
जो सत्य समजण्या तयार नसावा
कडवटपणा भरला अंतरी,
संशयाचा पाश आवळला तो कोणी तोडावा

