तू...
तू...
तू समोर नसताना
तुझेच भास होतात
वेड्या या मनाला
तुझेच वेेेध लागतात
नको नको ती
स्वप्न पडतात
आणि हृदयाची
स्पंदने वाढवतात
विरह तुझा सहवता सहवता
रात्र माझी संपून जाते
रात्री पाहिलेले स्वप्न
पहाटे भंगून जाते
तुझ्या सवे जगायचे
तुझ्याच सवे मरायचे
हेच ध्येय आता
या मनी वसायचे

