STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

प्रीतिच्या बेटावर

प्रीतिच्या बेटावर

1 min
222

कुणीच नाही या वाटेवर

दोघे आपण या बेटावर


सागर पसरे बघ क्षितिजावर

ढग नाचतात मग तालावर


जरा विसावू या गवतावर

डोळ्यांत सलग बघत खोलवर


दिव्य भव्य ही सुंदरता

मनात गुंजे ही मोहकता


निवळत गेली ही दाहकता

तोड मनाची तुझी शांतता


कवेत घे हे तारे सारे

वाहत आले प्रीतिचे वारे


चुंबून हळू घे दवबिंदू

ओठांवरील हे जलबिंदू


अवतरेल बघ इथेच स्वर्ग

आहे साक्षी भव्य निसर्ग


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Romance