STORYMIRROR

Sapana Thombare

Romance

3  

Sapana Thombare

Romance

आयुष्य उध्वस्त करुनी ती

आयुष्य उध्वस्त करुनी ती

1 min
231

लग्नात मी तिच्या पाहुणा म्हणून गेलो

खुशीत आहे का ती बघण्या म्हणून गेलो


 खेळ प्रेमाचा खेळली घात माझा करुनी

हळदीचा रंग तिच्या बघण्या म्हणून गेलो


 ओळख माझी देतांना शेजारी म्हणून केली.

 मांडवात लग्न अक्षदा बघण्या म्हणून गेलो


 अर्ध्या वाटेत हात माझा सोडून ती गेली 

 मेहंदीत दुसरे नाव बघण्या म्हणून गेलो


 स्वप्ने माझी उध्वस्त करून संसार थाटला

 रूप तिचे मोहनारे बघण्या म्हणून गेलो


 हृदयाशी माझ्या टाईमपास म्हणून खेळली

 गालावरचे हसू तिच्या बघण्या म्हणून गेलो

 

 वरात तिच्या लग्नाची माझ्या दारावरून गेली

 मांडवात लग्न अक्षदा बघण्या म्हणून गेलो 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance