तुझ रूसण
तुझ रूसण
तुझं ते हक्कानं रुसणं.
खूप वेळ चिडून राहणं.
बोलायचे असून ही अबोल राहणं.
यातूनच कळत मला, तू माझा असणं.
ती तुझी चिडचिड तो तुझा राग.
किती ही मी बोलले सॉरी,
तरी लवकर जात नाही नाकावरचा राग.
तू चिडतोस रूसतोस हे ही मला आवडत.
दुसरं काही नाही ते तुझं माझ्यावरच प्रेमच असत.
खूप खूप तू बोलतोस, मन माझं दुखवत.
शान्त झालास की प्रेम तुझं डोळ्यात दिसत.
तू असा तू कसा माहीत नाही नेमका कसा?
केलंय ना प्रेम तुझ्यावर मग असो तू जसा.
तुझं रुसणं तुझं चिडणं सारच हवं आहे मला.
शब्दातुन बोलत नसलास तरी सार काही समजते मला.
तुझं माझ्यावर हक्क दाखवण,
मनावर मोरपीस तसं माझं सुखावण.
तू, तुझा राग, प्रेम यातच आहे माझं जगणं

