सांग ना ग सखे
सांग ना ग सखे
सांग ना ग सखे का? जातेस
अशी घोर लावून जिवाला
आठवतेस तू पुन्हा पुन्हा
वेड्या माझ्या मनाला
आठवणीत ग तुझ्या
मी सारखा झुरतो
झलक पाहण्या तुझी
रोज मी मरतो
हसतेस तू जेव्हा
काळजाचा ठाव घेतेस
घायाळ माझ्या मनाला
खोल घाव देतेस
हृदयाची तार छेडूनी
दूर अशी तू जातेस
हाल माझ्या मनाचे
तू दूरवरून पाहतेस
नको मला क्षणभरही
विरह तुझ्या प्रेमाचा
क्षणोक्षणी हवा गारवा
तुझ्या गोड प्रीतीचा

